सायलीच्या लग्नाचा रंगतदार 'बस्ता'

03 Feb 2020 15:22:40
sayali_1  H x W




"बस्ता" चित्रपटाचं पोस्टर लाँच


मुंबई : लग्न म्हटलं, की बस्त्याची खरेदी स्वाभाविकपणे येते. बस्त्याची खरेदी ही एक गंमतीशीर गोष्ट असते. आता हा रंगतदार "बस्ता" चित्रपटातून ३ एप्रिलला प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.



श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्मस् प्रस्तुत आणि पीकल एंटरटेनमेंट अँड मिडीया लि. यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत असून सुनील फडतरे आणि वर्षा मुकेश पाटील यांनी "बस्ता" चित्रपट ची निर्मिती केली आहे. तानाजी घाडगे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अरविंद जगताप यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. मंगेश कांगणे आणि शंकर पवार यांनी गीतलेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, अक्षय टांकसाळे, पार्थ भालेराव अशी उत्तम स्टारकास्ट आहे.


मुंडावळ्या बांधलेली, चेहऱ्यावर आनंद असलेली सायली संजीव या पोस्टरवर दिसत आहे. अतिशय लक्षवेधी असं हे पोस्टर आहे. त्यामुळेच हा चित्रपट नक्कीच मनोरंजक आणि वेगळी गोष्ट सांगणारा असेल यात शंका नाही.
Powered By Sangraha 9.0