हे ‘भूत’ बघून तुम्हीही घाबराल!

    दिनांक  03-Feb-2020 17:02:13
|
vicky kaushal_1 &nbs
विकी कौशलच्या ‘भूत’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूडमध्ये आघाडीच्या कलाकारांना टक्कर देणारा विकी कौशल आता आणखी एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावे़ळी विकी चाहत्यांचं मनोरंजन करण्यापेक्षा त्यांनी घाबरवण्यासाठीच आला आहे. असं म्हणायला निमित्त ठरतोय तो म्हणजे त्याच्या ‘भूत : द हाँटेड शीप’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर!


सोशल मीडियावर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांनीही या भटपटाविषयी उत्सुकता आणि कुतूहल व्यक्त केलं आहे. खराब हवामानामुळे एक जहाज किनाऱ्यावर लागलेल्या एका जहाजाच्या दृश्यापासून या ट्रेलरची सुरुवात होते. यामध्ये विकी कौशल हा पृथ्वी नावाचं पात्र साकारत आहे. पुढे प्रत्येक दृश्यातून चित्रपटाच्या कथानकाच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या गोष्टी उलगडत जातात.एक अनोळखी आणि तितकंच मनुष्यविरहित जहाज, त्यामध्ये असणारी प्रत्येक वस्तू, घडणारी प्रत्येक घटना ही काहीतरी सांगत असल्याचं या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. आता या घटना नेमक्या का घडत आहेत आणि त्या घडण्यामागे नेमकी काय कारणं आहेत, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.


हिरू यश जोहर, करण जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खैतान हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. भानू प्रताप सिंह दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरमधूनच भीतीची अनुभूती होत आहे. २१ फेब्रुवारीला हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.