घृणास्पद ! वर्ध्यात तरुणीला भररस्त्यात पेटवले ; प्रकृती चिंताजनक

    दिनांक  03-Feb-2020 13:59:04
|

vardha_1  H x W
 
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकामध्ये एका तरुणीला भर रस्त्यात जाळण्याचा प्रकार घडला आहे. ही तरुणी शाळेत शिकवणीसाठी जात असताना तरुणाने तिचा पाठलाग करून भर रस्त्यामध्ये अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. या घटनेमुळे हिंगणघाट हादरले आहे. सोमवारी सकाळी ७.३० वाजता ओरोपी विकेश नगराळे याने या शिक्षिकेला पेटवून दिले. आरोपी हा घटनास्थळाहून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
 
 
पीडित ३० वर्षीय शिक्षिका ही ३० ते ३५ टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपजिल्हा रुग्णालयातून नागपूरकडे रवाना करण्यात आले आहे. तसेच, आरोपी विकेश हा शिक्षिकेच्या गावातलाच असल्याची माहिती देण्यात येत आहे. पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी करत चौकशी सुरू केली आहे. परंतु, या सर्व प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्धामधील पोलिस महासंचालकांना याबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.