सोन्या चांदीचे दर गडगडले!

29 Feb 2020 14:37:46
gold silver _1  




कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मंदी

मुंबई : शनिवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळाली. चीनमधील कोरोना विषाणूचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर झाला आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दारात घसरण झाली आहे. शुक्रवारी दिल्लीमध्ये सोन्याच्या दरात २२२ रूपयांची घसरण झाली. यानंतर दिल्लीतील सोन्याच्या दर ४३ हजार ३५८ रूपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर गुरूवारी अखेरच्या सत्रात सोन्याचा दर ४३ हजार ५८० रूपयांवर पोहोचला होता. जागतिक बाजारातील मंदीचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला असल्याचे एचडीएफसी सिक्युरीटीजचे म्हणणे आहे.

सोन्याव्यतिरिक्त चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे पहायला मिळाले. शनिवारी चांदीच्या दरात ६० रूपयांची घसरण झाली.  चांदीचा दर ४८ हजार १३० रूपये प्रति ग्रामवर पोहोचला आहे. गुरूवारी बाजारात चांदीचा दर ४८ हजार १९० रूपये इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीचे दर घसरणीसह ट्रेंड होत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर १ हजार ६३२ रूपये प्रति औस तर चांदीचा दर १७.२५ डॉलर्स प्रति औस इतका होता.
Powered By Sangraha 9.0