कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला चालणार

29 Feb 2020 09:59:41
kanhiyya kumar_1 &nb


कन्हैया कुमार, उमर खलीदसह अन्य दहा जणांवर देशद्रोहाचा आरोप
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिदसह १० जणांविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवण्यास दिल्ली सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. गेल्या वर्षभरापासून दिल्ली सरकारच्या दफ्तरी हे प्रकरण प्रलंबित होते. भाजपकडून सातत्याने यावरून दिल्ली सरकारवर टीका करण्यात येत होती.


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १९ फेब्रुवारी रोजीच याबाबत संकेत दिले होते. देशद्रोहाच्या संबंधित गुन्ह्यात आरोपींवर खटला चालवण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यास संबंधित विभागाला सांगण्यात आले आहे, असे केजरीवाल म्हणाले होते. विशेष म्हणजे केजरीवाल यांचे हे विधान ज्यादिवशी आले त्याचदिवशी दिल्लीतील एका न्यायालयाने दिल्ली सरकारला या प्रकरणात विचारणा केली होती. दिल्ली पोलिसांनी याबाबत सरकारला आठवण करून द्यावी, असेही न्यायालयाने नमूद केले होते.


दरम्यान, कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्यसह १० जणांविरुद्ध १४ जानेवारी रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. ९ फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात संबंधित आरोपींनी देशविरोधी घोषणांचे समर्थन केले व बेकायदा निदर्शने केली, असा आरोप सर्वांवर ठेवण्यात आला होता.
Powered By Sangraha 9.0