'भविष्यातील भारत आणि आव्हाने' व्याख्यानाचे आयोजन

27 Feb 2020 13:42:47
Ajey Bharat _1  



ठाणे : 'भविष्यातील भारत आणि आव्हाने' या विषयावर वक्ते भाजप राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांचे व्याख्यान दि. ७ मार्च सायंकाळी ७ वाजता ठाण्यातील टीएमसी मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्था, ठाणे यांच्यातर्फे आयोजित अजेय भारत व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी देवधर यांच्यासह ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पंडित महावीर प्रसाद पैन्युली हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले आहेत.
 
 
सहभागी होण्यासाठी शनिवार दि. ७ मार्च रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत ठाणे पश्चिम येथील टीएमसी मैदान, युनिवर्सल शाळेनजीक, ब्रम्हांड फेज ५, जी. बी. रोड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. सा. विवेक आणि दै. मुंबई तरुण भारत कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत. तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण 'महाएमटीबी'च्या फेसबूक पेजवर केले जाणार आहे.



Powered By Sangraha 9.0