मुंबईकर अजिंक्यची बढती, पण विराटने अव्वल स्थान गमावले

26 Feb 2020 16:45:44

virat kohli_1  
 
 
नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या कसोटीमध्ये भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने सामना १० विकेट्सने जिंकून मालिकेमध्ये १ - ० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या कोट्याही फलंदाजाला न्यूझीलंडने टिकू दिले नाही. कर्णधार विराट कोहलीने देखील दोन्ही डावांमध्ये निराशाजनक धावा केल्या. पहिल्या डावामध्ये ९ तर दुसऱ्यामध्ये १९ धावा केल्या. या खराब कामगिरीचा विराटला आयसीसी क्रमवारीत फटका बसलेला असून त्याने आपलं अव्वल स्थान गमावलेले आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने आता अव्वल स्थान मिळवले आहे.
 
 
 
 
 
 
टॉप १० मध्ये आणखी ३ भारतीय फलंदाज
 
 
कर्णधार विराट कोहली व्यतिरिक्त भारताच्या आणखी ३ फलंदाजांना या यादीत समावेश करण्यात आला आहे. दोन्ही डावांमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यशस्वी सामना करणाऱ्या मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांना बढती मिळाली आहे. मयांकने १२ व्या स्थानावरुन दहाव्या स्थानावर झेप, तर अजिंक्य ९व्या स्थानावरुन ८व्या स्थानावर झेप घेतली आहे. चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो सातव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर घसरला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0