एक दौड जलसंवर्धनासाठी !

26 Feb 2020 15:05:55

Marathod 2020_1 &nbs






मुंबई : भारतातील सर्वात मोठी रासायनिक अभियांत्रिकी संस्था आयसीटीद्वारे १० आणि ५ किमी 'आयसीटी मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेतील विद्यार्थी संख्या कमी असूनदेखील गेली अनेक वर्षे त्यांनी अनेक धावपटूंची गर्दी सांभाळली आहे. विद्यार्थ्यांद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटातील धावपटू सहभागी होतील. पर्यावरण जनजागृती हे या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य आहे.
 
 
भारतातील 'एमआरआर रेट'मध्ये 'आयसीटी मॅरेथॉन'चा नववा क्रमांक असून मुंबईतील तिसऱ्या क्रमांकाची मॅरेथॉन म्हणून नोंद आहे. 'आयसीटी'तर्फे यंदा जलसंवर्धन मोहिमेबद्दल जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. पाणी संपुष्टात येण्यापूर्वी जागे व्हा, या धर्तीवर आयसीटीच्या 'वॅट-ए-रन', अशी थीम ठेवली आहे. मोठ्या संख्येने धावपटू दरवर्षी यात सहभागी होतात. २२ मार्च. २०२० रोजी जागतिक जल दिनानिम्मित्त जलसंवर्धन मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा!, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्क : ९९२०५ ४९७७०
Powered By Sangraha 9.0