आदित्य ठाकरे अडचणीत येतील म्हणून अजित पवारांनी दिले उत्तर

26 Feb 2020 14:18:12

assembly_1  H x
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस प्रचंड गाजला. यावेळी सावरकरांचा गौरव प्रस्ताव तर अध्यक्ष्यांनी नाकारलाच तर विरोधातही अनेक निर्णय अध्यक्ष्यांनी घेतले. दरम्यान,मंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच विधानसभेत आमदारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रश्न उपस्थित केला. मात्र, ते अडचणीत येतील हे लक्षात येताच अजित पवारांनी हस्तक्षेप करत स्वत: उत्तर दिले. यावरून या तीन चाकी सरकारमधील संमावयाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
 
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना एक प्रश्न उपस्थित केला. 'एशियन डेव्हलपमेंट बँक ही पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी निधी देते. मात्र, पर्यटन विकासासाठी निधी दिला जात नाही. यासाठी सरकार काय करणार?,' असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला. हा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारला होता. मात्र, ते अडचणीत येतील हे लक्षात येताच अजित पवारांनी हस्तक्षेप करत स्वतः उत्तर दिले. ते म्हणाले की, 'गेल्या महिन्यात या संदर्भात बैठक घेतली. विरोधकांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. पायाभूत सुविधांसाठी अशा प्रकारच्या संस्था निधी देण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी पक्षांकडून जे काही सुचवण्यात येत आहे, तेच आम्ही अंमलात आणतो. त्याबद्दलच आदित्य ठाकरेंनी थोड्या वेळापूर्वी सांगितले.' अशाप्रकारे पहिल्यांदाच उत्तर देणाऱ्या आदित्य यांच्या साथीला अजित पवार धावून आले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते.
 
 
Powered By Sangraha 9.0