पाकिस्तानवर इस्लामिक दहशतवाद संपवण्यासाठी दबाव टाकणार : ट्रम्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |
Donald Trump _1 &nbs



भारत-अमेरिकेदरम्यान २१ हजार कोटींचा करार



नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण घोषणा केल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले, "गेल्या तीन वर्षांत उभयदेशांतील व्यापाराचे आकडे वाढले आहेत. द्विपक्षीय व्यापार संबंधाबद्दल सकारात्मक चर्चा आज झाली. एक मोठा व्यापार करारही झाला आहे. याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील."
 
 
ट्रम्प म्हणाले, "दोन्ही देशांमध्ये २१.५ हजार कोटींचा सुरक्षा करार झाला आहे. दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी एकत्र येणार असून पाकिस्तानवर इस्लामिक दहशतवाद संपवण्यासाठी दबाव टाकणार आहोत."
 
 

तीन महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

 
 
संरक्षण क्षेत्रातील २१ हजार कोटींच्या करारानंतर उर्जा क्षेत्रासंबंधीत करारावरही स्वाक्षरी करण्यात आली. 5G नेटवर्क संदर्भातही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तंत्रज्ञान आणि संरक्षण या महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. संरक्षण करारा अंतर्गत भारताला एमएच-६० रोमियो हेलिकोप्टर मिळणार आहे. हे जगातील सर्वात उच्च तंत्रज्ञान असलेले हेलिकॉप्टर आहे.
 
 
त्यांच्या कुटूंबियांच्या स्वागतामुळे ट्रम्प भारावून गेले असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली. भारत-अमेरिकेदरम्यान मुक्त व्यापारासंदर्भात आपण अनुकूल असल्याचेही ते म्हणाले. भारत-अमेरिकेदरम्यानच्या काही पैलूंवर भाष्य केल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. व्यापार आणि 'पीपल टू पीपल कनेक्शन' या मुद्द्यांवर आपण चर्चा केल्याचेही ते म्हणाले. उभय देशांच्या वाणिज्य मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीतून सकारात्मक निर्णय येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




 
 
@@AUTHORINFO_V1@@