दिल्ली-अलीगड हिंसा प्रकरणाचे धागेदोरे पीएफआय, भीम आर्मीशी ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |
Delhi-Voilance Sharukh-Kh
 
 
 


नवी दिल्ली
:दिल्ली आणि अलीगड येथे भडकलेल्या हिंसाचार प्रकरणाचे धागेदोरे शोधण्याचे काम आता पोलीसी सुत्रांनी सुरू केले आहे. गतवर्षी झालेल्या एनआरसी-सीएए विरोधातील हिंसाचारात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) असल्याचे उघड झाले होते. आता या प्रकरणातही पीएफआय आणि भीम आर्मीवर संशयाची सुई फिरत आहे. 'पीएफआय' ही कट्टर इस्लामिक संघटना असून भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर उर्फ रावण हा आहे.
 
 
 
उत्तर प्रदेश राज्यातील गुप्तचर विभागाने काही फोन-कॉल्सच्या काढलेल्या माहितीच्या आधारे खुलासा केला आहे. दिल्लीतील गोळीबार आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचार आणि अलीगढ येथील हिंसाचाराशी संबंध जोडलेले आहेत, असा दावा उत्तर प्रदेशच्या गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. या अहवालात नमुद केल्यानुसार, अलीगड येथील आंबेडकर नगरमध्ये भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी शहर दंडाधिकाऱ्यांना प्रदर्शनाबद्दलची माहिती सोपवल्यानंतर पीएफआय अधिकाऱ्यांची भेट घेतली.
 
 
 
अलीगड मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेने याच दरम्यान पीएफआयची भेट घेतली. शहरातील एका धार्मिक स्थळावर भीम आर्मीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोहोचले व पोस्टर हटवत सरकारविरोधी घोषणा दिल्या. स्थानिक धार्मिक स्थळाबाहेर हल्ला केला. त्यामुळे उपराकोट येथे हिंसाचार सुरू झाला. या ठिकाणीही सीएए विरोधात आंदोलन सुरू होते.
 
 
 
"अलिगडमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचे स्पष्ट आहे. दिल्लीतही अशाच प्रकारे हिंसाचार उफाळून आला. दोन्ही घटनांमध्ये साम्य आहे. आमच्या हाती काही महत्वपूर्ण फोन संभाषण लागले असून आणखी पुरावे गोळा करण्याची तयारी आम्ही करत आहोत.", अशी माहिती अलीगड पोलीस सर्कल ऑफीसर एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिली.
 
 
 
दिल्ली आणि उत्तर प्रदेश येथे दोन्ही ठिकाणी झालेल्या हिंसाचारात बरेच साम्य दिसून येत आहे. बहुतांश आंदोलक हे निशस्त्र होते. मात्र, त्यांच्याकडे दगड कुठून आले याची माहिती नाही. तसेच दोन्ही घटनांनंतर परिसरातील दुकांनांमध्ये लूट सुरू झाली होती. दिल्लीतील जाफराबादमध्ये एका पेट्रोलपंपावर आग लावण्याचा प्रकारही झाला.
 
 
 
या अहवालातील माहितीनुसार, पोलीसांना आंदोलकांनी निशाणा बनवला. यात एका पोलीस मुख्य कॉन्स्टेबल रतनलाल यांचा मृत्यू झाला. अलीगढ येथे पोलीस निरिक्षक रविंद्र कुमार सिंह आणि अन्य पोलीसांवरही हल्ला झाला. सरकारी मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे.
 
 
 
 
सक्तवसुली संचलनालयने यापूर्वीच गृहमंत्रालयाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, पीएफआय या संस्थेच्या खात्यातून सीएए विरोधी आंदोलनकर्त्यांना लाखो रुपये पाठवण्यात आले आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशात ७३ बॅंकांच्या खात्यांमध्ये अशाप्रकारे रक्कमेची देवाणघेवाण झाली आहे. पीएफआयच्या दिल्लीतील खात्यातूनच ही रक्कम पाठवल्याची माहिती आहे.
पीएफआयचे मुख्यालय शाहीनबाग येथेच आहे. ज्या ठिकाणी सीएए विरोधात दोन महिन्यांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. भीम आर्मी आणि पीएफआयचे संबंध असल्याचा अहवाल ईडीनेही दिला आहे. पीएफआयचा दिल्लीतील प्रदेशाध्यक्ष मोहम्मद परवेज अहमद शाहीनबागेतील आंदोलकांचा म्होरक्या आहे. तसेच भीम आर्मीच्या व्हॉट्सअपग्रुपशीही संलग्न आहे.





@@AUTHORINFO_V1@@