दिल्ली पोलिसांवर गोळीबार करणारा तरूण अटकेत

25 Feb 2020 11:14:41

delhi firing_1  



नवी दिल्ली
: सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर भागात सोमवारी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफळला आहे. यावेळी मौजपूर भागात आंदोलनांनी हिंसक वळण घेतलेले असताना बंदुकीच्या आठ गोळ्या चालवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली आहे. या तरुणाची ओळख दिल्ली पोलिसांना पटली असुन, त्याचे नाव शाहरुख असल्याचे समोर आले आहे. तो तेथील स्थानिक रहिवासी असल्याचेही सांगण्यात आले आहे.


हा तरूण पोलिसांसमोर देखील गोळीबार करत होता. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनाही न जुमनता त्यांने बंदुकीद्वारे आठ गोळ्या झाडल्या. दिल्लीतील हिंसाचाराच्या या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. गृहराज्य मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिल्ली हिंसाचाराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, ही घटना अत्यंत चुकीची आहे. मुद्दाम वाद निर्माण केला जात आहे. लोकशाहीच्या मर्यादेत राहून आपल्या भावना व्यक्त केल्या गेल्या पाहिजेत. दोन महिने राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवला तेव्हा देखील आम्ही अडथळा निर्माण केला नाही. आता दगडफेक केली जात आहे, जाळपोळ केली जात आहे, सरकार हे सहन करणार नाही. यावर कठोर कारवाई केली जाईल.
Powered By Sangraha 9.0