ठाकरे सरकारविरोधात भाजपचा एल्गार ; राज्यभर धरणे आंदोलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |


bjp elgar_1  H


निष्क्रिय ठाकरे सरकारविरुद्ध भाजपाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन


मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी भाजप तयारीत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढते अत्याचार यासह महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्यभर धरणे आंदोलन सुरु केले आहे. शेतकरी कर्जमाफी, ठाकरे सरकारची निष्क्रियता, महिला सुरक्षा याविषयांवर भाजपने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राज्यभरात ४०० ठिकाणी हि आंदोलने सुरु आहेत.



मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन
केले जात आहे. यासोबतच राज्यातील सर्व तहसील, जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात करण्यात येत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आजाद मैदान येथे दुपारी १२ ते ३ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात भाजपचे सर्व प्रमुख नेते आणि आमदार सहभागी झाले आहेत.

@@AUTHORINFO_V1@@