लोअर परळमध्ये भीषण अपघात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Feb-2020
Total Views |
dumper_1  H x W





डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

मुंबई : लोअर परळच्या बावला मस्जिद भागात भरधाव वेगाने आलेल्या डंपरच्या धडकेने तिघांना चिरडले. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. सोमवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. दारूच्या नशेत चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.


लोअर परळच्या ना. म. जोशी मार्गावरील बावला मस्जिदीजवळील मोनोरेलच्या पुलाखाली हा अपघात झाला. भरधाव वेगाने हा डंपर पुलाखालून जात होता. यावेळी चालक दारूच्या नशेत असल्याने त्याचे डंपरवरील नियंत्रण सुटले आणि त्याने उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. यात एका टॅक्सीचे नुकसान झाले, तर आणखी एका कारचा चक्काचूर झाला. घाबरलेल्या डंपर चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न करत, वाहनाचा वेग वाढवला. रस्त्याने चालणाऱ्या तिघांना या डंपरने जोरदार धडक दिली. यात धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. जखमीला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवत डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.
@@AUTHORINFO_V1@@