कर्जमाफीच्या पहिल्या यादीत १५ हजार लाभार्थी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |
Uddhav Thackeray _1 


 
 
मुंबई : गेल्या काही काळापासून शेतकरी डोळे लावून बसलेल्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांची निवड केली होती. त्यानुसार, आता १५ हजार लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारने जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आदी मंत्री महोदयांची उपस्थिती होती.

 

सत्तेवर येऊन तीन महिने झाले तरी सरकारला सूर गवसलेला नाही. तिन्ही पक्षांमध्ये आपसातच सुसंवाद नाही. त्यांनी आधी आपसात संवाद साधावा, मगच आम्हाला चहापानासाठी व सुसंवादासाठी बोलवावे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले. शेतकरी कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार, पोलिसांचे खच्चीकरण आदी विषयांवर सरकारला घेरणार असल्याचेही ते म्हणाले.
 


विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदांची घोषणा केली. सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, चिमणराव पाटील, अनिल भाईदास पाटील, संग्राम थोपटे, कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली.
 
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री गोपीकिशन बाजोरिया, डॉ. सुधीर तांबे, अनिकेत तटकरे, प्रा. अनिल सोले यांची नियुक्ती केली. विधानपरिषदेचे सभागृह नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या नावाची सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडून घोषणा करण्यात आली. यापूर्वी विधानपरिषदेचे सभागृह नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई होते.
 
 
 
विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला 'वंदे मातरम्'ने सुरुवात करण्यात आली. यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.









@@AUTHORINFO_V1@@