शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्यांचा निषेध : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |
Devendra-Fadanvis _1 



कर्जमाफीवरून विचारला सरकारला जाब

मुंबई : 'कर्जमुक्ती नाही, चिंतामुक्ती नाही, ७/१२ कोरा नाही, अवकाळीची मदत नाही', असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला. तसेच महिलांवरील वाढलेल्या अत्याचाराबद्दल सरकारने कुठली भूमीका घेतली नाही, याच आम्ही निषेध करतो, असे फडणवीस यांनी अधिवेशनानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.
शेतकऱ्यांचा चिंतामुक्त, भयमुक्त आणि कर्जमुक्त करण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याऐवजी अटीशर्थी लावून शेतकऱ्यांची निराशा केली आहे. सर्व प्रकारच्या कर्जांचा अंतर्भाव कर्जमाफीत केला नाही, याचा आम्ही निषेध करतो, असे फडणवीस म्हणाले.


राज्यात होणाऱ्या महिला अत्यांचारांवरही त्यांनी सरकारला प्रश्न विचारला. महिला अत्याचाराचा वाढता आकडा लक्षात घेता सरकारकडून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची आवश्यकता होती. मात्र, नव्या सरकारच्या कार्यकाळात त्याबद्दल कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही, याचा जाब आम्ही सरकारला विचारणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.


विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदांची घोषणा केली. सदस्य सर्वश्री संजय शिरसाट, चिमणराव पाटील, अनिल भाईदास पाटील, संग्राम थोपटे, कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली.


अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री गोपीकिशन बाजोरिया, डॉ. सुधीर तांबे, अनिकेत तटकरे, प्रा. अनिल सोले यांची नियुक्ती केली. विधानपरिषदेचे सभागृह नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांच्या नावाची सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याकडून घोषणा करण्यात आली. यापूर्वी विधानपरिषदेचे सभागृह नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई होते.

विधानपरिषदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला 'वंदे मातरम्'ने सुरुवात करण्यात आली. यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह विधानपरिषदेतील सदस्य उपस्थित होते.


@@AUTHORINFO_V1@@