न्यूझीलंड विरुद्धचा पराभव काही मोठी गोष्ट नाही : विराट कोहली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |

virat kohli_1  
नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा १० गडी राखून पराभव केला. दुसऱ्या डावात भारताला १९१ धावा करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर अवघ्या ९ धावांचं आव्हान होते. ते न्यूझीलंडने अगदी सहज गाठले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, हा पराभव काही मोठी गोष्ट नाही, असे धक्कादायक विधान भारताचा कर्णधार विराट कोहलीने केले.
 
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने सांगितले की, "मला माहिती आहे की, या सामन्यात आमच्याकडून चांगला खेळ झाला नाही. पण काही लोकं या पराभवाला जास्त महत्व देत आहेत. पण आमच्यासाठी हा फक्त एक कसोटी सामना आहे. एका कसोटी सामन्यात पराभव झाला, ही गोष्ट आपण स्वीकारायला हवी. पण त्याची एवढी मोठी गोष्ट करता कामा नये."
 
पुढे, "काही लोकांसाठी तर हा पराभव म्हणजे जगाचा अंत झाल्यासारखा वाटत आहे. पण माझ्यासाठी हा पराभव ही एवढी मोठी गोष्ट नक्कीच नाही. कारण आम्ही हा पराभव स्वीकारला आहे. या पराभवातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले आहे. आता हा पराभव उगाळण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही आता दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीला लागले आहोत." अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@