डोंबिवलीचा भोपाळ होण्याची कल्पना भ्रामक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |

KAMA org_1  H x
डोंबिवली :" 'मेट्रोपोलिटन एक्झिम प्रा.लि.' या रासायनिक कंपनीला लागलेल्या भीषण आगीनंतर डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले होते. या घटनेनंतर अनेक राजकीय पक्षांनी आणि काही नागरिकांनी 'डोंबिवलीचा भोपाळ करू नका'अशी अनाठायी भीती व्यक्त केली होती. यावर डोंबिवलीचा भोपाळ होण्याची कल्पना भ्रामक आहे. येथील कंपन्यांमध्ये गॅस बनवला जात नाही. त्यामुळे जनतेला घाबरण्याचे काहीही कारण नाही," असे आवाहन शनिवारी 'कामा' संघटनेने केले.
 
 
 
डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. डोंबिवली पत्रकार संघाच्यावतीने 'कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन' (कामा संघटना) सोबत संघटनेच्या कार्यालयात वार्तालाप आयोजित करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांसह माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष नारायण टेकाडे, सचिव राजू बैलूर, खजिनदार डॉ. निखील धूत, बाबाजी चौधरी, मार्चचे अध्यक्ष बाबजी चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी 'कामा'चे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले, " 'मेट्रोपोलिटन एक्झिम प्रा.लि.'च्या आग प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. या कंपनीला आग लागल्यानंतर कंपनीतील ट्रान्सफॉर्मरच्या शेजारी असलेल्या डिझेलच्या ड्रमला आग लागून तो फुटला. त्याचा लाल गोळा आकाशात उडाला होता. मात्र, त्याला गंभीर स्वरूप दिले गेले. मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या बैठकीत कंपन्याचे स्थलांतर हा मार्ग नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
 
औद्योगिक भागापासून निवासी भाग ५०० मीटर्स लांब असावा व बफर झोन निवासी करावा," अशी मागणी 'कामा' संघटनेने केली. "या कंपनीबाबत सुरक्षतेची काळजी घेत आहोत. या समस्यांसाठी कार्यक्षम यंत्रणा उभी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लवकरच भेट घेणार आहे, " असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, "जिल्हाधिकार्यांच्या तिमाही बैठकीत स्थानिक अग्निशामक विभाग अत्यंत अकार्यक्षम असल्याची तक्रार केली आहे. रासायनिक कंपन्यातील कामगार आणि अधिकारी वर्गाचा सहभाग असलेले 'मोब ड्रीम'(रंगीत तालीम) केली जाते. त्याप्रमाणे इमर्जन्सी कंट्रोल सिस्टीम सुरू करण्यात आली. ५०० कोटी आर्थिक व्यवहार असलेल्या 'मेट्रोपोलिटन एक्झिम प्रा.लि.' या रासायनिक कंपनी अल्प विम्यासाठी कशाला आग लावून घेईल, असे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@