भारताच्या संरक्षणासाठी अमेरिका करणार मदत : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Feb-2020
Total Views |

donald trump_1   
 
 
 
अहमदाबाद : भारतीय संरक्षणासाठी अमेरिका भारताला मदत करणार असून भारताला ३ बिलियन डॉलरचे हेलिकॉप्टर आणि संरक्षण साहित्य देणार असल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. "भारत देश मला आणि अमेरिकेला नेहमीच प्रिय वाटतो." असे सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल स्तुती केली. तसेच भारताची खरी ताकद हे या देशांचा नागरिकांमध्ये आहे असेदेखील त्यांनी सांगितले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्या उपस्थित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबाद येथील भव्य अशा मोटेरा स्टेडियमवर करोडो नागरिकांना संबोधित केले. यावेळी भारताच्या अनेक वैशिष्ठ्यांची स्तुती ट्रम्प यांनी केली.
 
 
 
 
"अमेरिकन लोक भारतावर प्रेम करतात हे सांगण्यासाठी आम्ही ८,००० मैलांनंतर आलो आहोत. ५ महिन्यांपूर्वी अमेरिकेने आपले महान पंतप्रधानांचे स्वागत केले होते. आज भारताने जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये आमचे स्वागत केले. सुंदर आणि नवीन मोटेरा स्टेडियमवर येऊन संबोधित करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमच्या हृदयात भारतासाठी विशेष स्थान राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जीवन देखील या महान देशाच्या प्रवासाला अधोरेखित करते. ते त्यांच्या वडिलांसोबत चहा विकत होते. ते याच शहरात एक कॅफेटेरियामध्ये काम करत होते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये ते निवडून आले. तुम्ही फक्त गुजरातचे प्रतिक नाहीत तर भारतीय जे हवे ते पूर्ण करतो याचे तुम्ही एक प्रतीक आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कथा असाधारण मार्गाने प्रगती करण्याची आहे. ही भारताची देखील कहानी आहे. भारत जगभरातील मानवतेसाठी आशा आहे. हा जगातील सर्वात अद्वितीय देश आहे." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@