मुंबईच्या महाविद्यालयांत 'फ्री काश्मीर'चे पोस्टर्स !

23 Feb 2020 22:20:56
TiSS _1  H x W:


संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

मुंबई : जेएनयुतील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनादरम्यान एका विद्यार्थिनीने 'फ्री काश्मीर'चे पोस्टर्स झळकावल्याच्या घटनेला महिना पूर्ण होत नाही, तोच शहरातील महाविद्यालयांतही हाच कित्ता पुन्हा एकदा गिरवण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करण्याच्या नावाखाली महाविद्यालयांमधील फलकांवर 'फ्री काश्मीर'सह देशविरोधी आणि आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला आहे.





TiSS _1  H x W:
 
 
शहरातील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या (टीआयएसएस) कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयांमध्ये हा प्रकार घडला असल्याची माहिती 'दलित पॉझिटिव्ह मूव्हमेंट'कडून (डीपीएम) रविवारी ट्विटरद्वारे देण्यात आली. याप्रकरणी डीपीएमकडून टीआयएसएसच्या संचालकांकडे तक्रार नोंदवण्यात आली असून हे कृत्य करणाऱ्यांवर  कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी डीपीएमकडून करण्यात आली आहे.




IIT MUmbai _1  

 
 
टीआयएएसतर्फे महाविद्यालयांमध्ये सध्या विद्यार्थ्यांसाठी 'समीक्षा' कार्यक्रम चालविले जात आहेत. सामाजिक विषयांवर आधारित असणाऱ्या   या कार्यक्रमांमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी प्रक्रियांना विरोध केला जात आहे. या कार्यक्रमासाठी तयार करण्यात येणार्याध पोस्टर्समध्ये देशविरोधी आणि आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात येत आहे. त्यात 'फ्री काश्मीर', 'काश्मीरवर दडपशाही', 'सीएए' असे संदेश लिहिण्यात आले आहेत. हे देशविरोधी कृत्य असून असे प्रकार करणाऱ्यांविरोधात  तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.








Powered By Sangraha 9.0