'युविका'ची मोदींकडून स्तुती

23 Feb 2020 21:38:20
Man Ki Baat By PM Modi _1
 



नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ६२ व्या 'मन की बात' या कार्यक्रमात भागीरथी अम्मा, काम्या कार्तिकेयन यांच्यासहीत पूर्णियाच्या महिलांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच या कार्यक्रमात पंतप्रधानांनी 'इस्रो'च्या 'युवा विज्ञानी कार्यक्रम' अर्थात 'युविका' कार्यक्रमाचाही उल्लेख केला. तरुणांना विज्ञानाशी जोडण्यासाठी इस्रोने 'युविका' कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाची माहिती पंतप्रधान मोदींनी आपल्या 'मन की बात'मध्ये दिली.
 
 
काम्या कार्तिकेयन हिच्या यशाचा इथे नक्की उल्लेख करायला हवा, 'माऊंट एकोनगोवा' सर करणार्‍या काम्याला खूप सार्‍या शुभेच्छा, असे म्हणत पंतप्रधानांनी तिचे कौतुक केले. दक्षिण अमेरिकेचं सर्वात उंच शिखर (७ हजार मीटर उंच) असलेल्या माऊंट एकोनगोवाच्या माथ्यावर काम्याने तिरंगा फडकावला. यानंतर आता काम्या आणखी एका मिशनवर आहे. 'मिशन साहस'द्वारे ती प्रत्येक खंडातील सर्वात उंच शिखर सर करणार आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
 
 
पंतप्रधांनी आपल्या या भाषणात १०५ वर्षीय भागीरथी अम्माची कहाणीही मांडली. आयुष्यात पुढे सरण्यासाठी आपल्यातला विद्यार्थी कधीही मरू देऊ नका, अशी प्रेरणा भागीरथी अम्मा देत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. केरळच्या कोल्लममध्ये राहणारी भागीरथी अम्माने परीक्षेत ७५ टक्के गुण मिळवलेत. गणितात त्यांना १०० पैंकी १०० मार्क मिळालेत. त्यांनी अजूनही पुढे शिकण्याची इच्छा आहे, मी त्यांना प्रणाम करतो, असेही मोदींनी 'मन की बात'मध्ये म्हटले.



Powered By Sangraha 9.0