महापालिका इमारतींच्या अग्निसुरक्षा पुन्हा तपासा !

23 Feb 2020 21:52:16
Pravinsingh Paradeshi _1&



आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले निर्देश

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सर्व इमारतींची, रुग्णालयांची, शाळांची नियमानुसार अग्निसुरक्षा असावी, यासाठी पुन्हा एकदा तपासण्या करून घ्याव्यात, असे निर्देश आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी संबंधित अधिकार्यां ना दिले आहेत. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच वरिष्ठ अधिकार्यां्ची एक विशेष आढावा बैठक झाली. त्या बैठकीत आयुक्तांनी हे निर्देशदिले. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासह आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त चंद्रशेखर चौरे, महापालिकेच्या चारही मुख्य रुग्णालयांचे अधिष्ठाता, यांत्रिकी व विद्युत खात्याचे प्रमुख अभियंता, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे यांच्यासह संबंधित खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 
सध्या मुंबईमध्ये एका पाठोपाठ एक लागलेल्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीदरम्यान अग्निसुरक्षेसंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांची अग्निसुरक्षाविषयक तपासणी तातडीने करण्यात यावी. प्रमुख अग्निशमन अधिकारी, क्षेत्रिय उप अग्निशमन अधिकारी यांनी ही पडताळणी करताना रुग्णालयांचे अधिष्ठाता व संबंधित प्रशासकीय विभागांचे साहाय्यक आयुक्त यांचे सहकार्य घ्यावे, असे निर्देश देण्यात आले.
 
 

११ हजार अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त

गेल्या सहा महिन्यांमध्ये महापालिकेच्या सर्व २४ विभागांमधून ११ हजारांपेक्षा अधिक संख्येने अनधिकृत गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. तथापि, संबंधित गॅस वितरण कंपन्यांकडून हे सिलिंडर पुन्हा वापरण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर गॅस सिलिंडर जप्त झाल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावता येण्यासाठी लिलाव करता यावा, याकरिता धोरणाचा मसुदा तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) यांना दिले.
Powered By Sangraha 9.0