कोरोना पीडितांची मदत चीनने थांबवली ; भारताचा आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Feb-2020
Total Views |

china india_1  
नवी दिल्ली : चीनमधली कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून चीनमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. चीनमध्ये मृतांचा आकडा सुमारे २३००च्या वर पोहोचला आहे. अशातच भारत सरकारने चीनवर गंभीर आरोप केले आहेत. 'करोना व्हायरस' पीडितांसाठी मदत साहित्य पोहचवण्यासाठी आणि वुहानमधून भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी भारतीय वायुसेनेची विमाने सज्ज आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानांना आपल्या देशात प्रवेशाची परवानगी देण्यासाठी चीन जाणून-बुजून टाळाटाळ करत असल्याचा आरोप भारताने केला आहे. दुसरीकडे चीन दूतावास प्रवक्त्यांनी मात्र भारताचा हा आरोप फेटाळून लावत हुबेईमध्ये हा व्हायरस वेगानं फैलावत असल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे.


भारतीय हवाई दलाचे सी १७ ग्लोबमास्टर हे विमान कोरोनाव्हायरसमुळे त्रस्त चीनमधील वुहान प्रांताला जाणार आहे. या विमानातून काही औषधें व गरजेच्या वस्तू पाठविण्यात येणार आहे. परंतु चीनकडून अद्याप या विमानास मान्यता देण्यात आलेली नाही. चीन भारतीय विमानांना जाणीवपूर्वक मान्यता देत नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. एअरफोर्सचे विमान औषधे देऊन वुहानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणतील. वुहानमध्ये अडकलेले भारतीय मानसिक ताणतणाव आणि चिंताग्रस्त असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. तेथे अडकलेल्या भारतीयांमध्ये अनिश्चितता आहे की ते भारतात जाऊ शकतील की नाही.


चीनने आरोप फेटाळत दिले स्पष्टीकरण


चीन दूतावासातील प्रवक्त्याने स्पष्ट केले कि, आम्ही चीनमधील भारतीयांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य देत असतो आणि भारतीय नागरिकांच्या परतीसाठी सहाय्य करत आहोत. हुबेईतील परिस्थिती अद्यापही गुंतागुंतीची आहे. कोरोनावर प्रतिबंध व नियंत्रण ही गंभीर टप्प्यात आहे. या संदर्भात दोन्ही देशांचे विभाग संवाद साधत आहेत. चीनने उड्डाण करण्यास परवानगी देण्यास विलंब करण्यासारखे काहीही नाही.
@@AUTHORINFO_V1@@