शाहीनबागचा रस्ता खुला ; २ महिन्यानंतर मार्ग खुला

21 Feb 2020 12:56:17

shahin bag road_1 &n


नवी दिल्ली :
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेला नोएडा फरीदाबादचा रस्ता आज पुन्हा सुरू करण्यात आला. शाहीनबागमधील आंदोलनांमुळे हा रस्ता ६९ दिवस बंद होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी कालिंदी कुंज ते फरीदाबाद आणि जैतपूरकडे जाणारा मार्ग मोकळा केला आहे. आज अखेर एक मार्ग सुरु झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


नोएडा पोलिसांनी येथून दोन बॅरिकेट्स हटवले आहेत. हा रस्ता नोएडाच्या महामाया उड्डाणपुलापासून दिल्ली आणि फरीदाबादकडे जातो. मात्र, कालिंदीकुंज येथून शाहीन बागकडे जाणारा रस्ता अद्याप बंद आहे. हा मार्ग खुला करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने वार्तालाप सदस्य नेमले आहेत. या सदस्यांच्या निदर्शनास काही मार्ग आले. त्यानंतर हे मार्ग पुन्हा सुरु करण्यात आले.



विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे की,शाहीन बागेत रस्ता बंद असल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी अशा ठिकाणी जावे जेथे सार्वजनिक ठिकाणी अडथळा नाही. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने निदर्शकांचा निषेध करण्याचा अधिकार कायम ठेवला. तसेच निदर्शकांनी संजय हेगडे यांना निदर्शकांना पर्यायी जागी हलविण्यासाठी सकारात्मक भूमिका बजावण्यास सांगितले. ते म्हणाले की, या प्रकरणात संभाषणकर्ते वजाहत हबीबुल्लाची मदत घेऊ शकतात.
Powered By Sangraha 9.0