दुग्धाभिषेकावेळी जमा केलेले दूध मिळणार मुक्या जनावरांना

21 Feb 2020 20:23:48
PAWS_1  H x W:
 

डोंबिवलीत व्हाईट रिव्हल्युशनचा उपक्रम

डोंबिवली : सांस्कृतिक डोंबिवली शहरात शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक केला जातो. ते दूध वाया जाऊ नये, याकरिता डोंबिवली पूर्व व पश्चिम येथील शिवमंदिरात जाऊन 'पॉज प्लान्ट अॅंण्ड अॅयनिमल वेल्फेअर' सोसायटी या संस्थेच्यावतीने दूध जमा करण्याचे काम केले जाते.
 
 
ते दूध फिल्टर करून वृद्धाश्रम, अनाथालयांतील मुलांना, तसेच रस्त्यावरील भटके कुत्रे, मांजरी यांना दूध दिले जाते. हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे व त्यांची टीम गेली ५ वर्षं करीत आहे. व्हाईट रिव्हल्युशनच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
 
डोंबिवलीमध्ये पॉज संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भाविकांकडून तब्बल १०० लीटर दूध जमा केले. जमलेले दूध डोंबिवलीमधील काही संस्थांना व प्राण्यांना दिले जाईल, असे पॉज संस्थेकडून सांगण्यात आले. शुक्रवारी संस्थेच्या उपक्रमप्रमुख साधना सबरवाल यांच्यासह युनिशिया, ग्लेन आणि आयुष यांनी मंदिरातून सुमारे १०० लिटर दूध जमा केले. ते फिल्टर आणि गरम करून थंड केल्यानंतर रस्त्यावर फिरून भटक्या जनावरांना दिले. यंदा या उपक्रमाला शिवभक्तांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे साधना सबरवाल यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0