‘त्या’ वक्तव्यावर वारीस पठाणचा माफी मागण्यास नकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2020
Total Views |

waris pathan_1  





मुंबई
: ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम)चे प्रवक्ते आणि भायखळाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून माफी मागण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. ‘मी जे काही म्हटलेय ते संविधानाच्या मर्यादेतच राहून बोललो असल्याचे स्पष्टीकरण वारिस पठाण यांनी दिले आहे.


वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेचे झोड उठत असताना वारिस पठाण यांनी मात्र माफी मागण्यास नकार दिला. प्रसार माध्यमांशी बोलतना वारिस पठाण म्हणाले की, ‘मी संविधानाच्या मर्यादेत राहूनच बोललो आहे, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही, जे लोक विरोध करत आहेत ते कायद्याच्या विरोधात आहेत. भाजपा आम्हाला १३० कोटी लोकांपासून वेगळे करण्याच्या घाट घालत आहे.’ असे म्हणत पुन्हा एका हिंदू मुस्लीम तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान, "लक्षात ठेवा, १५ कोटी आहोत पण १०० कोटींवर भारी आहोत" असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. कर्नाटकतील गुलबर्गा येथे सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्यावेळी १५ फेब्रुवारीला हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी गुलबर्गा येथील सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू,” असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते. महत्त्वाचे म्हणजे एमआयएमचे खासदार आणि अध्यक्ष असदुद्दीन ओवेसीदेखील या कार्यक्रमास उपस्थित होते. वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात पुणे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


भाजपचे वारीस पठाण यांना चोख प्रत्युत्तर
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका करत सांगतले की, " कारण नसताना अशा पद्धतीने भाष्य करणारे १०० कोटी लोकांनाच अवमान करतात. अशी चिथावणीखोर वक्तव्य करून आम्ही पराक्रमी आहोत असे दाखवण्याचे कारण नाही. अशी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत." असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच,“अरे वारीस पठाण कोणाला घाबरवताय ? शिवसेनेचे महाराष्ट्र सरकार तुमच्या घमक्यांना शांतपणे सहन करेल, पण भाजप व महाराष्ट्राची जनता तुम्हाला असा धडा शिकवणार की तुमची ही भडकाऊ भाषण सुद्धा बंद होतील,” अशा इशाराच भाजपने त्यांना दिला.
@@AUTHORINFO_V1@@