'अण्णा-माईं’चे पडद्यामागचे ‘टीकटॉक’ प्रेम!

21 Feb 2020 13:05:47

anna_1  H x W:


मुंबई :
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने संपूर्ण प्रेक्षक वर्गाला मनोरंजनाची भुरळ घातली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेची मुख्य पात्रं म्हणजे अण्णा आणि माई. मालिकेच्या पडद्यावर जरी यांचे एकमेकांशी पटत नसले, तरी पडद्यामागे हे कलाकार धम्माल मस्ती करताना नेहमीच प्रेक्षकांना दिसतात. सध्या माधव अभ्यंकर आणि शकुंतला नरे म्हणजेच अण्णा आणि माईंचे ‘टीकटॉक’ व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहेत. पडद्यामागची ही धम्माल केमिस्ट्री प्रेक्षकही एन्जॉय करताना दिसत आहेत.





















Powered By Sangraha 9.0