‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देणाऱ्या अमुल्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

21 Feb 2020 11:02:17
amulya_1  H x W






ओवेसींच्या सीएएविरोधी सभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे

बंगळुरू : नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या तरुणीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अमुल्या असे या तरुणीचे नाव आहे. 'ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मसलमीन'चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासमोर अमुल्याने या घोषणा दिल्या.


पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या अमूल्याला थांबवण्याचा ओवेसी आणि आयोजकांनी प्रयत्न केला. परंतु, ती थांबली नाही. त्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून अमुल्याला ताब्यात घेतले. त्यानंतर अमुल्याला बंगळुरू न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी मंचावर असताना अमूल्याने मंचावर दाखल होत 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. यामुळे क्षणभर असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबत सभेचे आयोजकही गोंधळून गेले. यानंतर ओवेसी यांनी या घटनेची तत्काळ मंचावरूनच निंदा केली. 'शत्रू देशाच्या पक्षात दिल्या जाणाऱ्या घोषणांचे समर्थन केले जाऊ शकत नाही. आम्ही याची निंदा करतो. घडले ते चुकीचेच होतं', असे म्हणत असदुद्दीन ओवेसी यांनी वेळीच परिस्थिती सावरली. दरम्यान, अमुल्याच्या वडिलांनीही तिच्या या कृतीचा निषेध केला.
Powered By Sangraha 9.0