हिंद महासागरातील भारतीय नौदलात आण्विक बळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2020
Total Views |

INS khanderi_1  




नवी दिल्ली : हिंद महासागर क्षेत्रात चीन आणि पाकिस्तानकडून वाढत चाललेला धोका लक्षात घेता भारतीय नौदलाने आपल्या सागरी सुरक्षेत वाढ केली आहे. भारतीय नौदलाचे बळ वाढविण्यासाठी भारत नौदलामध्ये सहा पाणबुड्या समाविष्ट करण्याच्या तयारीत आहे. १.२ लाख कोटी रुपयांच्या या करारास लवकरच सरकारकडून मान्यता मिळू शकेल. वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार, या प्रकल्पात नौदलासाठी अणुऊर्जावर चालणार्यात सहा पाणबुड्या समाविष्ट केल्या जातील. जे टॉर्पेडो आणि क्षेपणास्त्रांसारख्या पारंपारिक शस्त्राने सुसज्ज असेल. या पाणबुड्यांमधून अण्वस्त्रे चालविली जातील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.


डीआरडीओचा नेव्हल डिझाईन संचालनालयाला पाठींबा


मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व काही पूर्वनिर्धारित नियोजनबद्धरित्या झाल्यास या पाणबुड्या पुढील १० वर्षांत भारतीय नौदलात सामील होतील. या प्रकल्पाचा प्रारंभिक डिझाईन टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. डीआरडीओच्या सहकार्याने नेव्हल डिझाईन संचालनालय आता या पाणबुडींचे तपशीलवार डिझाइन तयार करण्याची तयारी करत आहे.


२०१५ मध्ये मोदी सरकारने दिली या प्रकल्पाला मंजुरी
 
 
२०१५ मध्ये मोदी सरकारने भारतीय नौदलासाठी प्रलंबित प्रकल्पाला चालना देताना सहा अणुशक्तीवर चालणाऱ्या हल्ला करणाऱ्या पाणबुडी (एसएसएन) तयार करण्यास मान्यता दिली. विशाखापट्टणममधील शिपबिल्डिंग सेंटरमध्ये या पाणबुड्या तयार केल्या जातील. तथापि, अरिहंत वर्गातील आणखी एक पाणबुडी येथे आधीच तयार केली जात आहे.


भारतीय सेनेच्या ताफ्यात दोन अणुऊर्जा पाणबुड्यांसह १५ पाणबुड्या

भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या आयएनएस अरिहंत आणि आयएनएस चक्र यांच्यासह एकूण १५ पाणबुड्या कार्यरत आहेत. आयआरएस चक्र रशियाकडून दहा वर्षांच्या भाडेतत्वावर घेण्यात आले आहे, तर अरिहंत भारतात बांधले गेले आहेत. या दोन्ही पाणबुड्या अणू क्षेपणास्त्र हल्ला करु शकतात. या प्रकल्पात भारताला अरिहंतच्या बांधकामाशी संबंधित अनुभव असेल. या एसएसएन वर्ग पाणबुड्या जास्त खोलवर जाण्यात सक्षम असतील. तर त्यांचे सोनार आणि रडार पूर्वीपेक्षा अधिक प्रगत असतील. या पाणबुड्या ऊर्जा निर्मितीसाठी नवीन तांत्रिक अणु रिएक्टरने सज्ज असतील.


ताफ्यात असणाऱ्या  पाणबुड्या 
 
आईएनएस अरिहंत (आण्विक)
 
आईएनएस चक्र (आण्विक )
 
आईएनएस कलवारी
 
आईएनएस सिंधुघोष
 
आईएनएस सिंधुराज
 
आईएनएस सिंधुवीर
 
आईएनएस सिंधुरत्न
 
आईएनएस सिंधुकेसरी
 
आईएनएस सिंधुकीर्ति
 
आईएनएस सिंधुविजय
 
आईएनएस सिंधुशस्त्र
 
आईएनएस शिशुमार
 
आईएनएस संकुश
  
आईएनएस शल्की
 
आईएनएस संकुल
@@AUTHORINFO_V1@@