जर्मनीतील दोन बारमध्ये गोळीबार ८ ठार

20 Feb 2020 13:10:54


germany_1  H x



बर्लिन
: जर्मनीतील दोन वेगवेगळ्या बारमध्ये झालेल्या गोळीबारात आठजण ठार झाले आहेत. तर, पाच जण जखमी असल्याचे समजते. अज्ञात व्यक्तीनी हा गोळीबार केला. जर्मनीतील हनाऊ शहरातील हुक्का बारमध्ये हा गोळीबार झाला. हनाऊ शहर हे फ्रँकफर्टपासून २० किलोमीटर अंतरावर आहे. जवळपास एक लाख लोकसंख्या असलेले हे शहर आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाल्याचे वृत्त असून पोलिसांना हल्लेखोराचा शोध सुरू केला आहे.



जर्मनीतील स्थानिक वेळेनुसार रात्री १० वाजता ही घटना घडली. अचानकपणे हा गोळीबार झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तर
, हा हल्ला नेमका का करण्यात आला याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी व प्रशासनांनी तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले. या गोळीबारात किती बंदूकधारी सहभागी होते हे निश्चितपणे कळू शकले नाही आणि गुन्हेगारही पळून गेले आहेत. सशस्त्र पोलिस शहरात काही ठिकाणी शोध घेत आहेत, काही आजूबाजूच्या घरात व वसाहतींमध्ये जाऊन देखील तपास करत आहेत. बंदूकधार्‍यांना शोधण्यासाठी आणि शोधण्यासाठी पोलिस हेलिकॉप्टरचा वापरही करत आहे.

Powered By Sangraha 9.0