वेटिकन सिटी आणि मक्का मशिदीपेक्षा भव्य बनणार राम मंदिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Feb-2020
Total Views |
Ram-Mandir _1  
 

भव्य मंदिर बनाऐंगे !


नवी दिल्ली : श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र टस्ट्रच्या १५ दिवसांनंतर होणाऱ्या बैठकीत राम मंदिराच्या निर्माणाची तारीख ठरवली जाणार आहे. एकादिशीला होणाऱ्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात येईल. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, राम मंदिर क्षेत्र हे जगातील सर्वात मोठे धार्मिक स्थळ बनणार आहे. ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या मते, राम मंदिराची भव्यता ही वेटिकन सिटी आणि मक्कापेक्षा भव्य जागेत हे राम मंदिर बनवण्याची त्यांची इच्छा आहे. 
 
 

१११ एकरमध्ये राम मंदिर तीर्थक्षेत्र विकसित होणार

 
 
ख्रिश्चनांचे धार्मिक स्थळ वेटिकन सिटी ही ११० एकरात वसलेली आहे तर मक्का मशिदीच्या जागेची व्याप्ती ही ९९ एकर इतकी आहे. ट्रस्टकडे मंदिर निर्माणासाठी ७० एकर जागा आहे. काही सदस्यांनी आजूबाजूच्या जमिनीचा आढावाही घेतला आहे. नजीकचे अरविंदो आश्रम तीन एकर जमीन देण्यासाठी तयार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर हे १११ जागेवर निर्माण करण्याचा मानस ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा आहे.
 


कामदा एकादशीचा मुहूर्त

 
ट्रस्टची पहिली बैठक बुधवारी के पराशरण यांच्या निवासस्थानी झाली. हा एकादशीचाच दिवस होता. पुढील बैठकीला १५ दिवसांनंतर एकादशीचाच मुहूर्त संत महंतांनी दिला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, मंदिर निर्माणासाठी ४ एप्रिल हा कामदा एकादशीचा मुहूर्त दिला आहे. याशिवाय अन्य तीन दिवसांचाही मुहूर्त निवडण्यात आला आहे. चैत्र प्रतिपदा २५ मार्च (चैत्र प्रतिपदा), २ एप्रिल (रामनवमी) आणि ८ एप्रिल (हनुमान जयंती) या मुहूर्तांवरही विचार केला जात आहे.
 


विश्व हिंदू परिषदेचेच्या प्रतिकृतीनुसारच बनणार मंदिर

 
विश्व हिंदू परिषदेने निर्माण केलेल्या मंदिर प्रतिकृतीनुसारच मंदिर निर्माण केले जाणार आहे, हे निश्चित आहे. मात्र, उंचीबद्दलचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. मंदिराची प्रतिकृती तिच राहील. मात्र, उंची वाढवण्यासाठी मातीचा भराव टाकावा लागण्याची शक्यता आहे. तसेच हा भराव टीकेल का नाही हे पाहण्यासाठी भराव टाकून एक पावसाळा वाट पाहावी लागणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@