भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पाकच्या खेळाडूचे निलंबन

20 Feb 2020 17:18:08

umar akmal_1  H
 
 
नवी दिल्ली : पाकिस्तानी संघाचा क्रिकेटपटू उमर अकमलला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे. क्रीडाविश्वातील ही सर्वात धक्कादायक बातमी आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अकमलवर कारवाई केली आहे. स्पॉट फिक्सिंग, मॅच फिक्सिंग असे अनेक आरोप पाक खेळाडूंवर अनेकवेळा लागले आहेत. तसेच आता उमर अकमलवर भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
 
 
 
चौकशी पूर्ण होईपर्यंत उमर अकमलला एकाही क्रिकेट स्पर्धेत खेळता येणार नाही असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले आहे. यामुळे सध्या चालू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२०मध्ये त्याला खेळात येणार नाही. पाक क्रिकेट बोर्डाने याबाबत एक पत्रक जारी केले असून त्यामध्ये म्हंटले आहे की, "पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गुरुवारी पीसीबी अँटी-करप्शन कोडच्या अनुच्छेद ४.७.१ नुसार कारवाई करण्यात आली आहे." या प्रकणाची चौकशी सुरु असल्याने यावर बोर्डाने यावर काही बोलण्यास नकार दिला.
 
 
Powered By Sangraha 9.0