श्रीराम मंदिर भवन निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा कोण ?

20 Feb 2020 17:40:31

photo story _1  



नृपेंद्र मिश्रा यांची श्रीराम जन्मभूमी भवन निर्माण समितीच्या अध्यक्षपदी निवड 




श्रीराम मंदिर भवन निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा असणार आहेत. भव्य श्रीराम मंदिर नृपेंद्र मिश्रांच्या देखरेखीत उभारले जाणार आहे.
 
 
mndir_1  H x W:
 
 

नृपेंद्र मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्य सचिव आहेत. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी निवृत्ती घेतली होती.

 

photo story _4   
 

नृपेन मिश्रा यांच्या निवडीचे एक कारण ते यूपीचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. पूर्व यूपीतील देवरियाचे असल्याने त्यांना राज्याची खडान् खडा माहिती आहे. श्रीराम मंदिर उभारणी प्रकल्प अचूक पद्धतीने पार करण्यास सक्षम असल्याकारणाने निवड करण्यात आली.


photo story _1   
 

माजी मुख्यमंत्र्यांचे आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांचे खासगी सचिवही राहिले आहेत. बाबरी पाडण्याच्या वेळी ते कारसेवकांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात होते. तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांशी नि:पक्षपातीपणे वागण्याचा सल्ला दिला होता.


photo story _1   
 

श्रीराम मंदिर आंदोलन आणि मंदिरासोबत संतांची भावनिक जोड, अयोध्या रामजन्मभूमी चळवळीशी संघ परिवाराचा घनिष्ठ संबंध आहे. श्रीराम मंदिरात हिंदू धर्माची मुळे रुजलेली आहेत. पंतप्रधानांनी या गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेता केली निवड.

 

 

photo story _2  

 


कोणत्याही प्रकारच्या धोक्याला अजिबात थारा न देता मंदिर निर्माण करण्याचे लक्ष्य आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव राहिल्याकारणाने मिश्रा यांच्या कार्यशैलीची मोदींना महिती. निर्धारित वेळेत मंदिर निर्माण व्हावे यासाठी मिश्रा यांना राममंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष बनविले गेले.
Powered By Sangraha 9.0