पुलवामामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

19 Feb 2020 10:11:37
pulwama_1  H x





पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दलाकडून मंगळवारी रात्री तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख जंजीर रफीक वानी, राजा उमर मकबूल भट आणि अमीन भट अशी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते स्थानिक दहशतवादी असल्याचे बोलले जात आहे. दहशतवाद्यांकडून एके-४७, एके-५६, पिस्टल आणि हँड-ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.


मंगळवारी रात्री उशिरा जम्मू आणि काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि सेनेच्या संयुक्त टीमकडून ही कारवाई करण्यात आली. त्रालमध्ये दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने त्यांना घेराव घातला होता. त्यानंतर चकमक सुरु झाली. हे तीनही दहशतवादी 'अंसार गजवा उल हिंद' या संघटनेचे असल्याची माहिती मिळत आहे.


तीन जणांचे मृतदेह हाती लागले असून, मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांचे महनिरीक्षक विजय कुमार यांनी सांगतिले.
Powered By Sangraha 9.0