हडसर किल्ल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू ; शिवजयंतीनिमित्त आली होती किल्ल्यावर

    दिनांक  19-Feb-2020 15:44:00

hadsar fort_1  
 
 
पुणे : बुधवारी महाराष्ट्रभर शिवजयंतीचा उत्साहात साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी करण्यासाठी तरुणाईने गड- किल्ल्यांची वाट पकडली होती. अशामध्येच मुंबईमधील एक तरुणी आपल्या साथीदारांसोबत शिवजयंती साजरी करण्यासाठी जुन्नर जवळ असलेल्या हडसर किल्ल्यावर आली होती. यावेळी किल्ल्यावरून पडून या २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.
 
 
 
शिवजयंतीला तरुण- तरुणींचे काही गट महाराजांची जयंती साजरी करण्यास विविध गडांना भेट देत असतात. असाच मुंबईतील एक गट शिवजयंती साजरी करण्यासाठी या किल्ल्यावर आला होता. याचा गटामध्ये असणारी २० वर्षीय तरुणी सकाळी ११:३० ते १२च्या सुमारास किल्ल्यावरून पडली आणि यात तिचा करुण अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी हजार झाली. तिच्या कुटुंबाला ही माहिती देण्यात आली असून ती मुलगी कोण होती अंडी कुठल्या भागातून होती याची माहिती अद्याप मिळाली नाही.