अश्लाघ्य कमेंट करणाऱ्या चाहत्याला सईने दिला ‘चित्रपट’ पाहण्याचा सल्ला!

18 Feb 2020 12:30:44
sai_1  H x W: 0




पोस्टवर वाईट कमेंट करणाऱ्याला सईने दिले चोख उत्तर


मुंबई : नुकताच अलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्या निमित्ताने अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून चित्रपटासंदर्भात पोस्ट केली होती. ‘तुम्ही ट्रेलर पाहिलात का?’,अशा आशयाच्या या पोस्टवर एका तरुणाने ‘तू असेच चित्रपट करतेस...आता स्वतःला बदल..’ अशी कमेंट केली. यावर सईने त्याला शालजोडीतले हाणत शांतपणे उत्तर दिले. ‘तू जर असाच विचार करत असशील, तर हा चित्रपट नक्कीच बघ’,असे सईने त्याला सांगितले.




‘सविता भाभी...तू इथेच थांब!!’ असे होर्डींग्स काही दिवसांपूर्वी पुण्यात दिसले होते. या होर्डींग्समुळे पुणेकर चांगलेच गोंधळात पडले होते. अखेर अभिनेत्री पर्ण पेठेने त्यांच्या आगामी ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर शेअर करत या प्रमोशन फंड्याची माहिती दिली. अभिनेता आलोक राजवाडे हा ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. सई यांत ‘सविता भाभी’ हे पात्र साकारणार आहे. या सईसह चित्रपटात सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके हे कलाकार देखील झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती गौरी आणि बनी डालमिया, सुरेश देशमाने, विनोद सातव यांनी केली आहे. हा चित्रपट ६ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Powered By Sangraha 9.0