भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या स्थानी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Feb-2020
Total Views |
Indian Economy _1 &n
 
 
 

अमेरिकाच्या संस्थेचा अहवाल


नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. २०१९ मध्ये भारताने ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. अमेरिकेच्या 'रिसर्च इन्स्टीट्यूट वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्हू' या संस्थेने हा अहवाल सादर केला आहे. जागतिकीकरणाचे धोरण खुलेपणाने स्वीकारल्याचा फायदा भारताला झाला आहे. स्वयंपूर्ण होण्याच्या वाटेवर असल्याने अर्थव्यवस्था उंचावत आहे.
 
 
या अहवालानुसार, 'आर्थिक विकासदराच्या तुलनेत २ हजार ९४० अब्ज डॉलर्सच्या जोरावर भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनला आहे. विकासदराच्या तुलनेत भारताने ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकले आहे.' ब्रिटनची अर्थव्यवस्था २ हजार ८३० डॉलर इतकी आहे तर फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचा आकार हा २ हजार ७१० अब्ज डॉलर इतका आहे. क्रयशक्ती समतेच्या आधारावर विचार केल्यास अर्थव्यवस्था १० हजार ५१० अब्ज डॉलर इतकी आहे. युवावर्गाची लोकसंख्या सर्वाधिक असल्याकारणाने सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉस डोमेस्टीक प्रोडक्ट ) प्रतिव्यक्ती २ हजार १७० डॉलर इतका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणात देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर इतकी नेण्याची लक्ष आहे.
 
 
अमेरिकेचे प्रतिव्यक्ती उत्पन्नाचा विकासदर हा ६२ हजार ७९४ डॉलर इतका आहे. गेल्या काही काळात भारताचा विकासदर खुंटला, असे आकडेवारी सांगते. ७.५ टक्के विकासदरावरून हा दर ५ टक्क्यांवर येऊन पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला होता. १९९०च्या दशकात भारतात सुरू झालेल्या उदारीकरणामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होत गेली. त्यानंतरच्या सरकारांनी अनेक सुधारणा केली. उद्योगांना नियंत्रण मुक्त करण्याचे काम झाले. परकीय गुंतवणूक आणण्यासाठीही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.



@@AUTHORINFO_V1@@