माझगावमध्ये जीएसटी भवनाच्या नवव्या मजल्यावर आग

17 Feb 2020 13:33:14
gst bhavan_1  H



अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी रवाना



मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आज पुन्हा एकदा अशाच दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. माझगावमध्ये जीएसटी भवनच्या इमारतीला मोठी आग लागली आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.




आग लागलेल्या इमारतीत जीएसटी कार्यालयाशिवाय सरकारच्या अन्य विभागाचीही कार्यालये आहेत. इमारतीच्या आठव्या व नवव्या मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दोन्ही मजल्यावरील कर्मचाऱ्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले आहे. आगीमुळे सर्व्हर रूमचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे कळते आहे. आगीची माहिती मिळताच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार पक्षाची बैठक सोडून तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0