नाणार प्रकरणावर मुख्यमंत्री भूमिका घेणार का?

17 Feb 2020 10:00:25

nanar_1  H x W:






मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पासून कोकण दौऱ्यावर


मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आहेत. रायगड, रत्नागिरी आणि त्यानंतर ते सिंधुदुर्गला जाणार आहेत. सकाळी रायगड दौऱ्यानंतर ते रत्नागिरीतल्या गणपतीपुळे इथे दाखल होणार आहेत. गणपतीपुळ्यात देवदर्शनानंतर विकास आराखड्यातील प्रमुख कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणपतीपुळे पर्यटन विकासासाठी मंजुर झालेल्या सुमारे १०२ कोटींच्या विकासकामांमधील प्रमुख कामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. तसेच गणपतीपुळे येथील आठवडाबाजार मैदानात मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान या दौऱ्यादरम्यन उद्धव ठाकरे नाणारवर काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या कोकण आवृत्तीमध्ये शनिवारी पहिल्या पानावर रिफायनरीची माहिती देणारी जाहिरात आल्याने शिवसेनेची भूमिका बदलली की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावर स्थानिकांनीदेखील आपला रोष व्यक्त केला आहे. या जाहिरातीनंतर याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा अशी मागणी होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या दौऱ्यात नाणार प्रश्नावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0