एकतर्फी लक्षणाचे आजार

17 Feb 2020 22:25:44


homeopathye_1  


शारीरिक व्याधींवर उपचार म्हणून सतत दिलेल्या या 'पेनकिलर'मुळे रुग्णाला आराम वाटू लागतो, पण काही काळापुरताच. काही कालावधीनंतर मात्र हा आजार जास्त प्रमाणात बळावतात. काही वेळा या आजारांमध्ये काही प्रमाणात आराम वाटतो. परंतु, आतील आजार मात्र तसाच राहतो.


एकतर्फी लक्षणांच्या आजारात अंतर्गत लक्षणांच्या आजाराचेसुद्धा दोन भाग आहेत. एकात फक्त शारीरिक व अवयव पातळीवरील लक्षणे दिसतात. दुसऱ्या प्रकारात फक्त मानसिक पातळीवरील लक्षणे दिसतात. आता आपण पाहणार आहोत की, अंतर्गत लक्षणे असणाऱ्या आजारात जे आजार फक्त शारीरिक लक्षणे दर्शवितात, त्यांचा उपचार कसा करायचा. फक्त शारीरिक लक्षणे असलेल्या आजारांमध्ये फार कमी लक्षणे दिसतात व त्यामुळेच हे आजार बरे होण्यास फार कमी कालावधी लागतो व हे आजार जुनाट होतात. या आजारांना बरे करण्यासाठी रुग्णांची व्यवस्थित चिकित्सा करणे गरजेचे असते. (case taking) लहानसहान लक्षणे व त्या लक्षणांमुळे होणारे शारीरिक बदल यांचे बारकाईने निरीक्षण करावे लागते. जे चिकित्सक या कलेत पारंगत असतात, ते या प्रकारच्या आजारांना लवकर बरे करू शकतात. सर्वप्रथम जी काही थोडी फार शारीरिक लक्षणे दिसतात, त्यावरून होमियोपॅथीच्या तत्त्वांनुसार शोधलेले होमियोपॅथीक औषध रुग्णाला दिले जाते. बऱ्याच वेळा जेव्हा ही शारीरिक लक्षणेसुद्धा प्रखरतेने व तीव्रतेने दिसून येतात, तेव्हा ती वैशिष्ट्यपूर्ण ठरतात व त्यानुसार दिल्या गेलेल्या औषधांमुळे आजार पूर्णपणे बरा होतो.

 

homeopathy_1  H 
 

काही रुग्णांच्या उपचारामध्ये असे होते की, फार कमी लक्षणांवरून जे औषध दिले जाते, ते संपूर्ण शारीरिक व मानसिक प्रकृतीला अनुसरून व अनुकूल नसल्यामुळे आजार पूर्ण बरा करू शकत नाही. यालाच आपण 'अंशत: संलग्न औषधे' असे म्हणतो. (Partially Indicated Medicine) अशा औषधांमुळे रुग्णाला तात्पुरता थोडाफार आराम मिळू लागतो. पण, फार थोड्या काळातच हा आजार पुन्हा डोके वर काढतो. इतर औषधप्रणालींमध्ये सर्रास वापरात असलेली वेदनाशमक औषधे म्हणजेच 'पेनकिलर'चा उपयोग हे याचे मोठे उदाहरण आहे. शारीरिक व्याधींवर उपचार म्हणून सतत दिलेल्या या 'पेनकिलर'मुळे रुग्णाला आराम वाटू लागतो, पण काही काळापुरताच. काही कालावधीनंतर मात्र हा आजार जास्त प्रमाणात बळावतात. काही वेळा या आजारांमध्ये काही प्रमाणात आराम वाटतो. परंतु, आतील आजार मात्र तसाच राहतो. त्रासदायक लक्षणांचे तात्पुरते दमन होते. या तात्पुरत्या दमनाला 'पॅलिएशन' असे म्हणतात. पुढील भागात आपण या आजारांचे निर्मूलन कसे करायचे, याबद्दल माहिती घेऊया.

 
 

- डॉ. मंदार पाटकर

Powered By Sangraha 9.0