शाहीन बागेतील आंदोलक महिला अमित शाह यांची भेट घेणार

15 Feb 2020 16:38:31

SHAHIN BAG _1  


नवी दिल्ली :
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) च्या विरोधात शाहिनबाग येथे निदर्शने करत असणाऱ्या महिला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या महिला रविवारी (दि.९) अमित शाह यांची भेट घेतील . परंतु, यावरून आंदोलकांमध्ये मतभेद असल्याचेही बोलले जाते आहे. अमित शाह यांनी आंदोलकांसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव आंदोलकांनी स्वीकारला आहे



दिल्लीतील शाहीनबागमध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआर विरोधात मुस्लिम महिलांचे धरणे आंदोलन सुरू आहे. गेल्या डिसेंबरपासून हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलक महिलांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी म्हणजे उद्या दुपारी २ वाजता आंदोलक महिला अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र आंदोलकांमध्ये यावरून मतभेद आहेत. एक गट चर्चेच्या बाजूने आहे तर एका गटाचा चर्चेला विरोध आहे. तरीही शहांना भेटणाऱ्या प्रतिनिधींमध्ये कुणाचा समावेश असेल हे अनिश्चितच आहे. आज याबाबत निर्णय घेण्यात येईल.
Powered By Sangraha 9.0