केजरीवाल यांच्या शपथविधीला शिक्षकांना उपस्थित राहण्याची सक्ती

15 Feb 2020 10:34:19

Kejariwal _1  H



  
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल रविवारी दिल्लीत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, यावेळई गर्दी जमेल की नाही अशी भीती असल्याने शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आल्याचा आरोप भाजप प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी केला आहे. त्यामुळेच ३० हजार शिक्षकांना या शपथविधीला उपस्थित राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत, असा टोला त्यांनी आम आदमी पक्षाला लगावला आहे.


केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते विविध क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले होते. दिल्ली सरकारच्या शिक्षण संचलनालयाने एक परिपत्रक जाहीर करत शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. यामुळे केजरीवाल यांच्यावर टीका करण्यात येत आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक आणि प्रत्येक शाळेतील २० शिक्षकांची यादी प्रवेशद्वारावर हजेरी तपासणाऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक शिक्षकाला १६ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० वाजता या शपथविधीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

  



Powered By Sangraha 9.0