अरविंद सावंत यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा

    दिनांक  15-Feb-2020 12:53:58
Uddhav-Thackeray-Aravind-
मुंबई :
खासदार अरविंद सावंत यांना आता कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. ठाकरे सरकार स्थापनेवेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर प्रथमच त्यांना ठाकरे सरकारने कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला आहे.

राज्याशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी नेमलेल्या खासदारांच्या समितीच्या अध्यक्षपदावर त्यांची नियुक्ती झाली आहे.


सावंत केंद्र सरकारमध्ये शिवसेनाकडून मंत्री होते. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना यांच्यातील वादानंतर सावंत यांनी केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा दिला. अशाप्रकारे एखाद्या खासदाराला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देणे ही राज्यातील पहिलीच वेळ आहे.