शशी थरूर यांना न्यायालयाचा दणका

15 Feb 2020 17:51:52

shashi tharoor_1 &nb



नवी दिल्ली
: दिल्लीच्या सत्र न्यायालयाने कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांना पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. मानहानीच्या खटल्यासाठी कोर्टात हजर न राहिल्याने त्यांना हा दंड झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी वादग्रस्त विधान केल्याने भाजप नेते राज बब्बर यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या कारणावरून त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. शशी थरूर यांनी ऑक्टोबर २०१०मध्ये बंगळुरू येथे झालेल्या कार्यक्रमात वादग्रस्त विधान केले होते असा आरोप करत भाजप नेते राज बब्बर यांनी कोर्टात तक्रार दिली. यापूर्वी १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने थरूर यांच्याविरूद्ध जामीनपात्र वॉरंटला स्थगिती दिली होती. १३ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर न राहिल्यामुळे त्याच्याविरूद्ध जामीनपत्र वॉरंट बजावले. ७ ऑगस्ट रोजी कोर्टाने त्याच्यावरील मानहानीच्या आरोपावरील निर्णय राखून ठेवला.
Powered By Sangraha 9.0