बनावट जन्म दाखला प्रकरण : आझम खान यांना न्यायालयाचा दणका

15 Feb 2020 13:58:56
Azam-Khan _1  H
 
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रामपूर मतदार संघातील लोकसभा खासदार आझम खान यांना प्रयागराज उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. यामुळे त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि पुत्र मो. अब्दुल्ला आझम खान यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. उच्च न्यायालयाने हा खटला रद्द करण्याची विनंती फेटाळून लावली. बनावट जन्म दाखला बनवल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात हे प्रकरण आहे. या प्रकरणी प्रयागराज उच्च न्यायालयात दोन्ही याचिका रद्द करावी अशी मागणी करण्यात आली होती.
 
 
प्रयागराज उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, 'याचिकेत दाखल केलेल्या आरोपांनुसार जर खटला दाखल झाला तर या प्रकरणी विचार केला जाईल. जर गुन्हा झाला असेल तर न्यायालय या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. यामुळे खान कुटूंबियांच्या अडचणी वाढणार आहेत.' या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते आकाश सक्सेना यांनी फसवणूक प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. आझम खान यांच्या प्रकरणात न्यायमूर्ती मंजू राणी यांनी आदेश दिले आहेत. आझम खान यांच्यावर जमीन गैरव्यवहार, आलिया मदरसातून पुस्तके चोरी, रामपूर क्लब येथून मुर्तीचोरी आदी आरोप आहेत. तसेच भूमाफीया म्हणूनही घोषित झाले आहेत.
 

Powered By Sangraha 9.0