भीमा-कोरेगाव प्रकरण 'एनआयए'कडे देण्याचा निर्णय योग्यच!

15 Feb 2020 14:15:04
भीमा-कोरेगाव_1  
 

रामदास आठवले यांचे मत

मुंबई : भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य आहे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. या प्रकरणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील मतभिन्नता उघड झाल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आहे.
 
अशा संवेदनशील प्रकरणी चर्चा करून निर्णय घ्यावेत. भीमा-कोरेगाव प्रकरण 'एनआयएक'डे देताना झालेला वाद हा खेदजनक आहे, राज्यातील वाद चव्हाट्यावर आणणे हे योग्य नसल्याचे मत केंद्रीय मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील एल्गार परिषदेचा तपास 'एनआयए' करणार आहे भीमा कोरेगाव येथे आंबेडकरी अनुयायांवर झालेल्या हल्ल्याचाही; एकूण भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास 'एनआयए'ला देण्यात यावा अशी सूचना आठवले यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0