पुण्यात झळकलेल्या ‘सविता भाभी....’ होर्डिंगचे ‘हे’ आहे कारण!

    दिनांक  14-Feb-2020 17:48:22
pune hording_1  
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’चा टीझर प्रदर्शित
मुंबई : गुरुवारी पुण्यात ‘सविता भाभी...तू इथंच थांब!!’ असे होर्डींग्स दिसल्याने सगळेच बुचकळ्यात पडले होत. या होर्डिंगचे नेमके कारण कुणालाच माहित नसले तरी, हा एखाद्या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असावा अशी शंका अनेकांनी उपस्थित केली होती. अखेरी शुक्रवारी यामागचे खरे कारण सगळ्यांसमोर आले. ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ नावाचा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही होर्डिंगची युक्ती वापरण्यात आली होती. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, सध्या तरुणाईत या चित्रपटाची चर्चा आहे.

या टीझरमध्ये कोणतीही व्यक्तिरेखा दिसत नसली तरी, 'हॅलो... मी सविता...तुझी सविता... तुम्हाला माहीत असलेली, पण तुम्ही कधीही न पाहिलेली...’, अशाप्रकारचा संवाद ऐकू येतो. या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. ‘अख्खं शहर वाट बघतंय तुझी!' अशा कॅप्शनसहीत अभिनेत्री पर्ण पेठेने हा टिझर सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
या चित्रपटात अभिनेत्री पर्ण पेठे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर बोल्ड अभिनेत्री सई ताम्हणकर देखील या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेता आलोक राजवाडे हा ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतच सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. या चित्रपटात सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके हे कलाकार देखील झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती गौरी आणि बनी डालमिया, सुरेश देशमाने, विनोद सातव यांनी केली आहे. हा चित्रपट ६ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.