'शिदोरी'च्या संपादकांना अटक करा : राम कदम

14 Feb 2020 16:45:41
Ram Kadam _1  H
 
 

"सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, कारवाई व्हायलाच हवी!"


मुंबई : काँग्रेसप्रणित राज्य मध्यप्रदेशमध्ये झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि काँग्रेसच्या शिदोरी या मासिकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल छापण्वयात आलेल्माया मजकूराबद्दल गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर भाजपतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार राम कदम आणि भाजप नेते किरीट सौमय्या यांनी या दोन्ही घटनांचा तीव्र निषेध व्यक्त केला. जोपर्यंत गुन्हा दाखल केला जाणार नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमीका राम कदम यांनी घेतली आहे.
 
 
"शिदोरी मासिकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल झालेल्या अवमान प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करावा आणि संपादकांना अटक करून मासिकावर बंदी आणावी, अशी मागणी आमदार राम कदम यांनी केली आहे. याचवेळी कुठलीही भूमीका न घेणाऱ्या शिवसेनेवरही त्यांनी टीकास्त्र सोडले. सत्तेसाठी शिवसेना आणखी किती लाचार होणार असा सवालही त्यांनी यावेळी विचारला आहे. शिवसेना गप्प का, 'सामना' गप्प का, मुख्यमंत्री कमलनाथ यांना जाब विचारणार का?, असा सवालही यावेळी विचारण्यात येणार आहे. या प्रकरणी आपण राज्यपालांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याची माहितीही आमदार कदम यांनी दिली आहे.



 
 
 
Powered By Sangraha 9.0