‘स्वीटी सातारकर’चा नादच नको!

    दिनांक  13-Feb-2020 17:47:50
sweety satarkar_1 &n
‘स्वीटी सातारकर’
चे धमाकेदार गाणे सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित


मुंबई : 'नाद नको दादा, पाठीशी बाय माझी... स्वीटी!' असे मजेदार शब्द असलेले "स्वीटी सातारकर" या चित्रपटातले गाणे सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आले. उडत्या चालीचे ताल धरायला लावणारे हे गाणे सोशल मीडियावर हिट होत आहे.


अत्यंत अतरंगी अशा स्वीटी सातारकर या तरुणीची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. एका तरुणाच्या मागे लागलेल्या या स्वीटी सातारकरला तो तरुण मिळतो का अशी गोष्ट या चित्रपटात आहे. नकाश अझीझ आणि भारती माधवी यानी हे गाणे गायले आहे. चित्रपटाचा टीजर आणि धमाकेदार गाण्यामुळे हा चित्रपट पुरेपूर मनोरंजक आणि फ्रेश दिसतो आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे आता चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.


मुनाफ नाईक, संतोष साबळे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केले असून, ध्रुव दास, सतीश जांभे आणि स्वरूप स्टुडिओझ हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सुमित गिरी यांनी चित्रपटाचे लेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन, फैसल महाडिक यांनी संकलन, मंगेश कांगणे आणि सुहास सावंत यांनी गीतलेखन केले आहे. चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे. येत्या २८ फेब्रुवारीला "स्वीटी सातारकर" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.