मनसेचा झेंडा वादात; निवडणूक आयोगाची नोटीस

13 Feb 2020 11:16:55

mns flag_1  H x




मुंबई :
छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा पक्षाचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. संभाजी ब्रिगेडसह राज्यातील इतर संघटनांच्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे.

महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाचा अंदाज घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात आपली राजकीय भूमिका मांडली. त्याची सुरुवात पक्षाचा झेंडा बदलून झाली. यापूर्वीचा चौरंगी झेंडा बदलून त्याजागी संपूर्णपणे भगवा ध्वज स्वीकारण्यात आला आहे. या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा आहे. त्यास राज्यातील काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. तसेच, निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती.या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने मनसेला पत्र पाठवले आहे. संघटनांच्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करा, असेही निवडणूक आयोगाने पात्रात म्हंटले आहे.
Powered By Sangraha 9.0